जळगावात तीन दिवसीय ‘संविधान महोत्सवा’चे आयोजन

नोव्हेंबर 2, 2021 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात तीन दिवसीय ‘संविधान महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात विविध पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि.३१ रोजी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Constitution Day jpg webp

बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, संविधान जागर समितीचे बाबुराव वाघ, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, प्रहार जनशक्तीचे युवक अध्यक्ष निलेश बोरा, हरीश कुमावत, विजयकुमार मौर्य, उदय सपकाळे, मिलिंद तायडे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, जयपाल धुरंधर, संदीप शिरसाठ, गौतम सोनवणे, नाना मगरे, सचिन श्रावणे, संदीप सपकाळे, दिलीप अहिरे, आकाश सपकाळे, महेंद्र केदार यांसह शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बोलतांना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी प्रस्थापित व्यवस्था संविधान संपवायचा प्रयत्न करत असल्याने जनतेला संविधानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे रहावे लागेल असे मत मांडले. प्रास्ताविक करताना भारत ससाणे यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले.

असे आहेत कार्यक्रम
तीन दिवस हा ‘संविधान महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान, दि.२६ नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान रॅली, दि.२७ नोव्हेंबर रोजी संविधानाचे अभ्यासक डॉ.सुरेश माने, डॉ.रावसाहेब कसबे, डॉ.विश्वंभर चौधरी व ऍड.असीम सरोदे या विचारवंतांच्या उपस्थितीत परिसंवाद व दि. २८ नोव्हेंबर रोजी संविधान जागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now