Redmi नोट 14 प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी! 50MP कॅमेरासह ‘ही’ वैशिष्ट्ये मिळतील..

जून 28, 2025 6:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही रेडमीचा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेटमुळे खरेदी करू शकला नसाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे रेडमीचा नोट १४ प्रो हजारो रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च किमतीपेक्षा खूपच स्वस्त उपलब्ध आहे. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता.

redmi note 14

रेडमी नोट १४ प्रो मध्ये ५०MP कॅमेरा आहे. तसेच, त्यात ५११० एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे. फोनच्या फीचर्सबद्दल तसेच, किंमत कपातीनंतर तुम्ही तो किती रुपयांना खरेदी करू शकाल. ते जाणून घेऊया.

रेडमी नोट १४ प्रो १८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. त्यावर २००० रुपये कमी करण्यात आले आहेत, म्हणजेच हा रेडमी फोन अमेझॉनवर १६,९९९ रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. स्मार्टफोनवर १,००० रुपयांची बँक डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही हा स्मार्टफोन पूर्ण ३००० रुपयांनी स्वस्त खरेदी करू शकता.

रेडमी नोट १४ प्रोची वैशिष्ट्ये
रेडमी नोट १४ प्रो मध्ये ६.६७ इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे ज्याची पीक ब्राइटनेस २१०० निट्स आहे. रेडमी नोट १४ प्रो मध्ये ५,११० एमएएच बॅटरी आहे आणि जलद पॉवर-अपसाठी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२५-अल्ट्रा प्रोसेसर आहे.

स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल बॅक कॅमेरा सेटअप दिसतो. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा ५० एमपी आणि सेकंडरी कॅमेरा २ एमपी आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन आयपी६४ रेटेड आहे म्हणजेच धूळ आणि पाणी स्मार्टफोनवर फारसा परिणाम करणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now