जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । राजकीय वातावरणात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचंड उलथापालथ सुरू झाली आहे. यातच एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाने आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदीच देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असा कौल दिला आहे. भारतीय जनता पुन्हा एकदा भारतीय जानता पक्षावर विश्वास व्यक्त करणार असा निष्कर्ष समोर आणला आहे.
देशाचा राजकीय मूड काय आहे? यावर हा सर्व्हे करण्यात आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ऐनवेळेला भाजपासोबत खेळी केली आहे. नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्यात यशस्वी ठरतील का? या प्रश्नावर जनतेतून ५६ टक्के लोकांचा होकार आला आहे. मात्र, ते विरोधकांचे नेते बनले तर त्याचा फायदा भाजपालाच होईल, असेही या बहुतांश लोकांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीला आता १८ महिने राहिले आहेत. असे असताना भाजपासह राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी चालवली आहे. भाजपाकडे मोदींच्या रूपात आश्वासक चेहरा असला तरी विरोधकांची शकले झाल्याने त्यांच्याकडे नेता नाहीयेत. विरोधक एकमेकांना मोठे होऊ देत नाहीत. यामुळे भाजपाने एकहाती सत्ता राखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

राहुल ‘गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला कितपत फायदा होईल, असे विचारले असता, ५० टक्के लोकांनी काँग्रेसला फायदा होणार असल्याचे सांगितले काँग्रेसचे अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरचे झाले तर फायदा होईल का? यावर ६४ टक्के लोकांनी अध्यक्ष गांधी कुटुंबातील झाला तरच काँग्रेसला फायदा होईल.असे मत नोंदवले.












