गुरूवार, जून 8, 2023

१२वी परीक्षेत मुलगा पहिला, आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना मृत्यूने गाठले

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । काल गुरुवारी महाराष्ट्र बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल लागला. दरम्यान या परीक्षेत मुलगा पहिला असलयाने आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना मृत्यूने वाटेत गाठले. मॅजिक गाडीने झाडाला धडक दिल्यात यात आनंदा भीमराव जगताप (रा. भारुडखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक गंभीर जखमी झाला दीपक मुरलीधर शेळके (रा. भारुडखेडा) असं गंभीर जखमीचे नाव आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. त्याचबरोबर मॅझिक गाडी सुध्दा एका बाजूला केली आहे. आनंदा भीमराव जगताप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णावरती उपचार सुरु आहेत.

गुरुवारी दुपारी १२ वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये मृत्यू झालेल्या आनंदा जगताप यांच्या मुलाने बारावीच्या वर्गात शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. मुलगा पहिला आल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या वडिलांना मृत्यूने वाटेत गाठले. अपघात झाल्याची माहिती ज्यावेळी गावात पसरली त्यावेळी लोकांनी गावात हळहळ व्यक्त केली.