⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद,नवी दिल्ली द्वारा प्रायोजित, ८व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी ऑनलाईन माध्यमातून सहभागी असलेले अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष डॉ. जटाशंकर यांनी बीज भाषण केले. तसेच प्रथम मुख्य वक्ता नव नालंदा महाविहारा,बिहार येथील डॉ. सुशिम दुबे यांनी योग विषयाचे महत्त्व तसेच आताच्या पिढीला त्याची आवश्यकता व आहारातील सात्विक, राजसिक आणि तामसीक यांच्यातील महत्व आदि संकल्पनांचे सुस्पष्ट विवरण त्यांनी सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितले.

द्वितीय मुख्य वक्ता देव संस्कृती विश्वविद्यालयाचे (हरिद्वार) योग आणि आरोग्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुरेश लाल बर्नवाल यांनी हठयोग आणि त्याचे अनेक उपयोग आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले.

मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, भाषा प्रशाळेचे संचालक डॉ. बी. एन. केसुर, योग आणि नॅचरोपेथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी संगणक विभागाचे महत्त्वपूर्ण साहाय्य मिळाले. कार्यक्रमाचे विषयप्रवर्तन डॉ.रजनी सिन्हा यांनी केले. याप्रसंगी प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन प्रा. अमोल पाटील यांनी केले.

Attachments area