शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला भर चौकात दिला चोप

मार्च 24, 2022 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । जळगावमध्ये एका अज्ञाताकडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य होते. ही आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) व्हायरल करणाऱ्या व्यक्तीस शिवसैनिकांनी भर चौकात चोप दिला आहे. या व्यक्तीला सर्वांसमोर हात जोडून माफी मागायला लावली.

yawal jpg webp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मेसेज शिवसैनिकांपर्यंत पोहचला. त्यांनी ही पोस्ट कोणाच्या मोबाइलवरून पहिल्यांदा पाठवण्यात आली आहे, याचा शोध घेतला. त्या संबंधित व्यक्तीला जाऊन गाठण्यात आले. भरचौकात आणून या व्यक्तीला चोप देण्यात आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनीही त्यांनाही तंबी देत दूर रहायला सांगितले. साधरणतः अर्धातास हा प्रकार सुरू होता.

संबंधित व्यक्तीने माफी मागायला सुरुवात केली. त्यावेळीस त्या व्यक्तीला इतरांनी कशी आणि कोणाची माफी मागायची हे सांगितले. त्यात मुख्यमंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जाहीर माफी मागायला लावली. त्यानंतर या व्हायरल पोस्ट प्रकरणावर पडदा पडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now