कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही : उद्धव ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । मला आई भवानीवर विश्वास आहे. आपल्यालवर तिचा आशीर्वाद आहे. यामुळे विजय आपलाच होणार आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरच नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतांना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका केली.
यावेळी उस्मानाबाद येथून आलेल्या कार्यकर्त्यांसह आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. “आई भवानीचा आशीर्वाद असल्याने कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही. दसऱ्याला आपण भेटणार आहोत. एक चांगली सुरूवात झाली आहे. न्यायालयात दुसरी केस सुरु आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
“तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे. कारण कैलासने काय पराक्रम केलं सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील पाहिलं आहे. जिथे लोकप्रतिनिधी घट्ट आहेत, तिथे शिवसैनिक घट्ट राहणारचं. ज्यांना तुम्ही खच्ता खाऊन मोठे केले, ते खोक्यात गेले,”असेही उद्धव ठाकरे म्हणाले