---Advertisement---
निधन वार्ता जळगाव शहर

‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन

nilkanth-barhate
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । येथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते ‘साईमत’ मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक परेश बऱ्हाटे यांचे आजोबा तर ‘लोकहित दर्पण’च्या संपादिका सुरेखा बऱ्हाटे यांचे सासरे होत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---