---Advertisement---
महाराष्ट्र

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे, मुख्यमंत्र्यांचे थेट पुणे पोलीस आयुक्तांना आदेश…

---Advertisement---

pune porshe jpeg webp

राज्यात घडलेल्या पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन केसमुळे सर्वत्र वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणात अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनीही कसून प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आले, तसेच वडिलांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा व त्यांना तीन लाख रुपये देण्याचा ही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील ब्लड सॅम्पल बदलण्याच्या आरोपावरून ससून मधील आरोपी डॉ.अजय तावरे व डॉ.श्रीहरी हाळनोर याबरोबर आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

अटकेनंतर या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही दोषी डॉक्टरांना निलंबित करा असा पुणे वैद्यकीय शिक्षण विभागासमोर प्रस्ताव ठेवला असून, त्या दोघं डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला आहे. या अटकेनंतर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हाळनोर यांच्या निलंबना बाबत लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना देखील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी दहा मिनिट चर्चा केली या प्रकरणाची व आरोपींची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपी पर्यंत पोहोचण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेत. त्यासोबतच बिल्डर मंत्री आमदार खासदार कुणाचाही या प्रकरणात सहभाग असल्यास त्यांनाही आरोपी करा या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा हेही मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले, तसेच मुख्यमंत्री पुण्यात घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची सखोल पाहणी करणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---