आजपासून GST चे नवे दर लागू, आता काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या एका क्लीकवर..

सप्टेंबर 22, 2025 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२५ । देशवासियांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने आज, (22 सप्टेंबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटी सुधारणा (जीएसटी 2.0) लागू केल्या आहेत. नव्या जीएसटी सुधारणेनुसार जवळपास सर्वच वस्तू आणि सेवा या ५ आणि १८ टक्के स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे स्वयंपाकघरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधे, उपकरणांपासून ऑटोमोबाइलपर्यंतच्या क्षेत्रात समाविष्ट ३७५ वस्तूंचे दर आजपासून कमी झाले.

GST2.0

यावेळी नवरात्रीची सुरुवात दुहेरी आनंदाने होत आहे. सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीसह, जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर, जीएसटी परिषदेने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात करून लोकांना महागाईची भेट दिली. यापूर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते. 5%, 12%, 18% आणि 28%. आता मात्र फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टॅक्स स्लॅब्स असतील. आजपासून, जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करायला जाल, तेव्हा त्या पूर्वीपेक्षा स्वस्त झालेल्या दिसतली, तर काही वस्तू अशाही आहेत, ज्यांचे दर वाढलेले दिसतील.

कोणत्या वस्तूंवर शून्य जीएसटी ?

अनेक वस्तू आणि सेवा पूर्णपणे जीएसटी मुक्त (०%) करण्यात आल्या आहेत.
खाण्याचे पदार्थ : UHT दूध, चीज, पिझ्झा, सर्व प्रकारची ब्रेड, रेडी टू ईट पोळी आणि पराठा.
शैक्षणिक साहित्य: पेन्सिल, नोटबुक, ग्लोब, चार्ट, सराव पुस्तके, प्रयोगशाळेच्या नोटबुक.
आरोग्य क्षेत्र : 33 जीवनरक्षक औषधे (३ कर्करोगाच्या औषधांसह), वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी.

5 % जीएसटी स्लॅब अंतर्गत येणाऱ्या वस्तू

अन्नपदार्थ : वनस्पती तेल, लोणी आणि तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्किटे, चॉकलेट, रस, नारळ पाणी.
पर्सनल केअर प्रॉडक्ट्स : शाम्पू, हेअर ऑईल, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम
घरगुती वापराची उत्पादने : स्वयंपाकघरातील भांडी, बाळाच्या दुधाच्या बाटल्या, छत्र्या, मेणबत्त्या, शिलाई मशीन, नॅपकिन्स/डायपर, हँडबॅग्ज, फर्निचर.
शेती उपकरणे : ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन, पंप.
हेल्थ प्रॉडक्ट्स : थर्मामीटर, ग्लूकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सीजन, चश्मा, रबर ग्लोव्ह्ज
कापड आणि पोशाख: तयार कपडे (2,500 रुपयांपर्यंत), ज्यूट/कापसाच्या पिशव्या, कृत्रिम धागा.
इतर: कोरीव कला उत्पादने, हस्तनिर्मित कागद आणि चित्रे, बांधकाम साहित्य (विटा, फरशा).

18 % जीएसटी स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू

इलेक्ट्रॉनिक उत्पादने : एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी/एलसीडी टीव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर.
वाहने: लहान कार, तीन चाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसी पेक्षा कमी मोटारसायकली, व्यावसायिक वाहने.
इंधन आणि पंप उपकरणे : ट्रॅक्टरसाठी हायड्रॉलिक पंप, इंधन पंप.
सर्व्हिस सेक्टर : टेल्स (दररोज 75000 रुपयांपेक्षा कमी ), चित्रपटगृहे (तिकिटे 100 रुपयांपेक्षा कमी), सौंदर्य सेवा.

विमाही स्वस्त

विमाही स्वस्त झाला आहे कारण सरकारने जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या सेवांवरील लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (GST) कमी केला आहे. पूर्वी, विमा सेवांवर 18% कर आकारला जात होता, ज्यामुळे व्यक्तींसाठी आरोग्य आणि जीवन विमा खरेदी करणे अधिक महाग झाले. मात्र आता जीएसटी कमी केल्याने लोकांचे पैसे वाचतील आणि विम्याचे प्रीमियम कमी होतील, ज्यामुळे विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसी खरेदी करणे स्वस्त होईल.

या गोष्टी महगाणार

तंबाखू, बिडी आणि पान मसाल्यावरील कर 40 टक्के राहील. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अद्याप जीएसटीच्या अधीन नसल्याने त्या कायम आहेत. त्यामुळे इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, लक्झरी कार आणि एसयूव्हीवरील कर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. शिवाय, 350 जास्त क्षमतेच्या बाईकवरील कर देखील वाढतील, ज्यामुळे किंमती वाढतील. शिवाय, शीतपेये आणि फ्लेवर्ड वॉटर सारख्या थंड पेयांच्या किमती देखील वाढतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now