जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील वाॅर्ड क्र २ मधुन एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक १८ रोजी पार पडली. यात एकुण ६१२ मतदान पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नितीन पाटील यांना ३०८ मत मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार यांना १८५ मते तसेच नोटाची ६ मते मिळाली. सुमारे तब्बल १२३ मतांनी नितीन पाटील हे विजयी झाले.

परिसरातुन महत्त्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीत काट्याची लढत रंगली होती. सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी आरक्षण असलेल्या या जागेवर शिवसेनेचे उमेदवार अजाबराव पाटील निवडुन आले होते. पाटील यांच्या निधनानंतर हि जागा रिक्त झाली होती. दरम्यान ओबीसी आरक्षण वादामुळे ऐनवेळी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. नंतर जनरल जागा निघाल्यामुळे दोन्ही माजी सरपंच पुत्र उमेदवार रिंगणात उतरले होते. विजेंद्र कोळी यांना १८५ मिळाली तर राष्ट्रवादी तर्फे नितीन पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विजेंद्र कोळी यांचा सुमारे ३०८ मतं मिळवत १२३ मतांनी दारुण पराभव केला. दरम्यान, ऍड. रोहीणी खेवलकर यांची भेट घेऊन पाटील यांनी विजयोत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव पाटील, सभापती विकास पाटील, पंडितराव पाटील, बाजिराव कोळी, वासुदेव कोळी, विनोद कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हा हादरला! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खुन केल्याचे लिहिले !
- लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा
- जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- जळगावात सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार; जिल्ह्यात उभारला जाणार ३९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प
- Jalgaon : आई -वडील बाहेर गावी जाताच युवकाने उचललं नको ते पाऊल ; कुटुंबियांना मोठा धक्का..