शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का : खान्देशातील ‘या’ बडा नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी? आज घोषणा करणार..

ऑगस्ट 9, 2023 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । आधीच राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये पडलेल्या फु्टीमुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसलेला आहे. पक्ष सावरण्यासाठी आणि पक्षाचा ताबा आपल्याकडेच राहावा म्हणून शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे. एकीकडे शरद पवार गटाचा पक्ष सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

sharad pawar jpg webp

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि धुळ्यातील बडे प्रस्थ असलेले अनिल गोटे (Anil Gote) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अनिल गोटे यांनी गेल्या गुरुवारीच राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. ते आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे

तसेच राजनीमा का दिला याची माहितीही देणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याशिवाय कोणत्या पक्षात जाणार याची माहितीही गोटे आज देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now