---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांच्या फेसबूक, ट्विटरवरुन राष्ट्रवादी गायब

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १८ एप्रिल २०२३ : अजित पवार यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ चिन्ह आणि शरद पवार यांच्यासह स्वतःचा फोटो असलेला वॉलपेपर डिलिट केलाय. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवारांचा फोटो होता. ते फोटो अजित पवारांनी डिलिट केलाय.

ajit pawar 2 jpg webp webp

अजित पवारांच्या नाराजी नाट्याने आज महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

---Advertisement---

मात्र अजित पवारांनी या बातम्यांमध्ये कुठेलेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही. मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत.

अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा शरद पवारांनी केल्यानंतर काही वेळानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीचा ÷उल्लेख हटविला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---