गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

मार्च 12, 2026 12:52 PM

विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे; प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे नवोपक्रमाचे आवाहन

ratriyvidnyanday

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय वैज्ञानिक डॉ. सीव्ही रामन यांच्या ‘रमन इफेक्ट’ या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उ. त. ठरारप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे सादर केली. मार्गेश वाघ, यश धनगर, भैरवी कुरकुरे, राजश्री यादव, रिद्धी भिरूड, गौरव इंगळे आणि माहिन शेख यांनी विज्ञानाचा समाजविकासात असलेला महत्त्वाचा वाटा स्पष्ट करत आपले विचार मांडले.प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना संशोधन व नवोपक्रमाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

यावर्षीच्या विज्ञान दिनाच्या विषयाचा संदर्भ देत विज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोविड काळात विकसित झालेली लस हा शतकातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध असल्याचे नमूद करत भविष्यातील अन्नटंचाईसारख्या समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्याची गरज असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष एआय अँड डीएस शाखेतील विद्यार्थी आदेश जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. नाकुल गाडगे होते. सर्व विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now