⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नशिराबाद बौद्ध समाजातर्फे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अंध-अपंग यांना ब्लॅंकेट वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथे बौद्ध समाजातर्फे रमाई आंबेडकर यांचा जन्मसोहळा अति उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम रमाबाई आंडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, बौद्ध समाज अध्यक्ष विनोद रंधे. जयंती समितीचे अध्यक्ष शांताराम सोनवणे. माजी. ग्राम.पंचायत सदस्य कविता रंधे यांच्या हातून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मनोगतात विनोद रंधे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगाचा उजाळा करून दिला. पंचशील घेण्यात आले. पूजा वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस महिलांनी सकाळच्या सत्रात संघीत खुर्ची व लिंबू चमचा स्पर्धा घेऊन हळदी कुंकू व गरिबांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महिलांनी गीते सादर करण्यात आली व रामाईच्या वेशभूषेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला विजयी स्पर्धकांना आई रमाई आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली व या कार्यक्रमाला सर्व महिलांनी पांढरी साडी आणि रंगीबिरंगी फेटे परिधान केले होते.

महिलांनी रांगोळ्या काढून आणि दीप लावून सर्व उपासक उपसिकांचे लक्ष वेधले. या वेळी डी.जे.च्या तालावरती रमाई जयंती साजरी केली. कार्यक्रमाच्या शेवटी तथागत बुद्ध विहारामध्ये उखाण्याचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला खिरदान वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कविता रंधे, रजाबाई सुरवाडे, रेखा मगरे, वंदना सुरवाडे, साधना सोनवणे, आशाबाई बिऱ्हाडे, कांताबाई रंधे, ज्योती खैरनार, चंद्रभागा सुरवाडे, तसेच रमेश रंधे, यशवंत करडे, श्रावण बिऱ्हाडे, दीपक सोनवणे, संतोष रगडे,अक्षय रंधे, यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा: