जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | कोणताही प्रदेश असो, तो प्रदेश नागरिकांसाठी उपयुक्त तेव्हाच ठरतो जेव्हा तो हिरवागार असतो. आणि याच अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिका पाऊले उचलत असून जळगाव शहर हिरवागार करण्यासाठी जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपये खर्च करणार आहे.(municapal corporation ready to make city green)
नुकतेच महानगरपालिकेतर्फे एका स्वायत्त संस्थेकडून जळगाव शहराचे सॅटॅलाइट इमेज म्हणजेच परग्रह तस्वीर घेण्यात आली. यावेळी निदर्शनास असे आले की, जळगाव शहरातील केवळ साडेसात टक्के परिसर हा ग्रीन झोन आहे. त्यातही केवळ साडेपाच टक्के ठिकाणी झाडे आहेत. तर इतर ठिकाणी झुडपं किंव्वा गवत आहेत. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मात्र जळगाव शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने लवकरच एक नवीन मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत जळगाव शहरातील विविध भागांमध्ये जाऊन महानगरपालिकेतर्फे झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांची देखभाल स्वतः महानगरपालिका करणार आहे. जेणेकरून शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहो. (jalgaon green city)
जळगाव शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे अशावेळी नागरिकांच्या आरोग्यावर धोका येऊ शकतो म्हणूनच आता नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिका सरसावली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर झाड संपूर्ण शहरातील विविध परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत. जेणेकरून ग्रीन झोन बनावित.
एखाद्या शहरातील वीस टक्के भाग हा ग्रीन झोन असला तर तेथील नागरिकांचे जीवन निरोगी असे म्हटले जाते. मात्र जळगाव शहरातील केवळ साडेसात टक्के हाच ग्रीन जोर आहे. आता जळगाव शहर महानगरपालिका लवकरच याबाबत पुढाकार घेत असून साडेसात टक्क्यावरून वीस टक्के पर्यंत ग्रीन झोन पोहोचवणार आहे. महानगरपालिका घेत असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासले जाणार आहे.