मनपा आयुक्तपदाचा डॉ. विद्या गायकवाड यांनी स्वीकारला पदभार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी शासनाच्य नगरविकास विभागातर्फे काढण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजता त्यांनी महापालिकेत येवून पदभार घेतला. तर, देवीदास पवार यांची अमरावती महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी परभणी येथील देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही बदली एकतर्फी झाल्यामुळे डॉ. गायकवाड यांनी त्या बदलीला ‘मॅट कोटीत’ अवाहन दिले होते.

शहरातील प्रलंबीत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, रस्त्याची कामे वेगाने सुरू करण्यत येतील, पार्किंग झोन व अतिक्रमणाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी उपायोजना करण्यात येईल.असे यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ विद्या गायकवाड म्हणाल्या