आमदार पाटीलांचा पाठपुरावा : मुक्ताईनगर मतदार संघासाठी 50 कोटींच्या निधीला मंजुरी!

ऑगस्ट 18, 2022 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगर मतदार संघासाठी 50 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. अखेर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नागरिकांतर्फे आनंद व्यक्त केला जात आहे.

MAL patil 3 jpg webp

पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागांतर्गत, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती.

अखेर मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत 28 कोटी रुपये, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत 14 कोटी रुपये , सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी 8 कोटी रूपये असे एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झालाआहे. यामुळे मतदार संघातील सुचविण्यात विविध विकास कामे होणार आहेत. यामुळे नागरिकांतर्फे आनंद व्यक्त होत असून एक सक्षम लोकप्रतिनिधी व विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व गुण मतदार संघासाठी लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories