मंत्री गुलाबराव पाटील असे गेले गुवाहाटीला : मुखमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२३ । काही महिन्यापूर्वी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला. यात सत्ता आली ती भाजप आणि शिंदे गटाची मात्र त्यावेळी गुलाबराव पाटील कसे गुवहाटीला गेले?. याचा गौप्यस्पोट खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याहून थेट जळगावला रवाना झाले होते. या अचानक केलेल्या जळगाव दौर्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा जोर धरु लागली आहे. यावेळी शिंदे यांनी मोठा गौप्यस्पोट केला यावेळी ते म्हणाले कि, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटी आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले

याचबरोबर एकनाथ शिंदे आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केले”, आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा,असेही म्हणाले