⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

खिर्डी येथे होतेय लाखो लिटर पाण्याची नासाडी: सरपंचाच्या आदेशाला केराची टोपली

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे गल्या दोन ते तिन दिवसापासून पाण्याच्या टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. खिर्डी बुद्रुक येथे असलेल्या पाण्याच्या टाकीचे पाणी दिवसेंदिवस लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असेल तर ग्रामस्थांना लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागल्या शिवाय राहणार नाही. तसेच जिल्ह्यासह शहरांमध्ये नागरिकांना आठवड्याआड दोन, तिन दिवसाआड पाणी मिळत असल्याने पाणी टंचाईचे चित्र दिसत आहे, अशा परिस्थितीत खिर्डी बुद्रुक येथील पाण्याची टाकी ओव्हर फ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले असता तेथील तंबुले फुल होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने योग्य नियोजन करून पाणीपुरवठा पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला समज द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

याबाबत खिर्डी बुद्रुक सरपंच यांना तोंडी तक्रारी करून सुद्धा काही उपयोग होत नसल्याने पाणी पुरवठा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोखो लिटरची होणारी पाण्याची नासाडी थांबवावी.कारण पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लीटर पाणी वाया गेल्याचा गंभीर प्रकार वारंवार घडत असुन वारंवार असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच जिल्ह्यासह शहरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे खिर्डी बुद्रुक येथील असलेली पाण्याची टाकी वारंवार ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जात असुन याकडे दुर्लक्ष होत असतांना दिसत आहे. अशी स्थानिक नागरिकांची ओरड आहे.

त्यामुळे पाणीपुरवठा वरिष्ठ विभागाने खिर्डी बुद्रुक येथे असलेल्या पाणी टाकीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी यांना तत्काळ सुचना द्याव्या जेणेकरून भविष्यात पाणी टाकी ओव्हर फ्लो होवून पाणी वाया जाणार नाही, अशी नागरिकांची मागणी होत आहे.