मिलिंद नार्वेकर सोडणार शिवसेना : महाजनांच मोठं वक्तव्य
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । सध्या राज्याच्या रोजच फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. रोज प्रत्येका पक्षातनवं नवीन पक्षप्रवेश होत आहेत. यातच मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार का ? असा प्रश्न नेहेमीच विचारला जात आहे. यातच आता अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नार्वेकर यांनी दिल्या. त्या नंतर याबाबतची चर्चा अजून जोर धरू लागली आहे.
भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केल आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचं मी ऐकतोय, असं विधान गिरीश महाजन केलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मिलिंद नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधानही गिरीश महाजन यांनी केलं आहे.