रावेरला कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

raver news-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । तालुक्यातील वाघाडी फाटा येथील प्रीतीकेश दादा मंगल कार्यालयात कोळी समाज संस्थातर्फे गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे हे होते.

महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजनन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रास्ताविक बंडू कोळी व विनायक कोळी यांनी केले. यावेळी माजी जी. प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, प्रभाकर सोनवणे जळगाव, दिलीप सूर्यवंशी, नारायण कोळी यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष रक्षा खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा व तबला वादक चिन्मय तायडे यांना सन्मान पत्र, चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास श्रीकांत महाजन, शिवाजीराव पाटील, रावेर मा.पं.स.सभापती कविता कोळी, मुक्ताईनगर मा.पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, भुसावळ मा.पं.स.सभापती वंदना उन्हाळे, मा.जि.प.सदस्य वैशाली तायडे, सरला कोळी, रुपाली कोळी, निलेश पाटील, आत्माराम कोळी, महेश चौधरी, हरीलाल कोळी, चंद्रकांत भोलाणे, छोटु पाटील, दुर्गादास पाटील, दिपक पाटील, पंडित कोळी, आयोजक विनायक कोळी, बंडू कोळी, ईश्वर कोळी, विजय कोळी, शरद कोळी, पंडित कोळी, संतोष पाटील, गंभीर उन्हाळे, सचिन महाले, ब्रिजलाल कोळी, गफूर कोळी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन ईश्वर कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रावेर तालुका समाज संस्था यांनी परिश्रम घेतले.