⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

महापौर महाजन यांनी दाखविला ‘‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रेरणेने निर्मित, मनाने आणि देहाने हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले आदरणीय स्व.आनंद दिघे साहेब यांच्या जीवनपटावर आधारित ‘‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’’ हा अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आज दि. 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या अगोदर दि. 7 मे 2022 रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच हा शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला होता.

युवासेना जळगाव महानगर आयोजित व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्या विशेष सहकार्याने आज जळगाव येथील आयनॉक्स थिएटरमध्ये सायंकाळी 6.45 वाजता ‘‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’’ हे चित्रपट शिवसैनिक, युवासैनिक व सर्वसामान्य नागरिकांना दाखविण्यात आले. चित्रपटाचा हा शो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हाऊसफुल झाला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. उपस्थित प्रत्येकजण चित्रपटातील प्रेरणादायी व उत्कंठापूर्ण क्षणांची वाट बघत होते. अशा या उल्हासपूर्ण वातावरणात टिपलेली क्षणचित्रे अत्यंत बोलकी होती. जळगाव शहरातही ‘‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’’ चित्रपट विविध सिनेमागृहात सुरु असून सर्वत्र शिवसैनिक, युवासैनिक व सर्वसामान्य नागरिकांकडून उत्तम असा प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे.


या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडिया, युवासेनेचे अमित जगताप, .शंतनु नारखेडे, प्रितम शिंदे आदी युवासैनिकांनी परिश्रम घेतले.