इकरा कोविड केअर सेंटरची महापौरांनी केली पाहणी

मार्च 24, 2021 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. महापौरांनी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा केली. साफसफाई व जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्या सोडविण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

ekara covid center jalgaon

जळगावात कोविड रुग्ण वाढत असून बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी इकरा कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी डॉ.विजय घोलप आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनुष्यबळ वाढविण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार

इकराच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज दाखल होत असून आणखी बेड वाढविण्यात आले आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मनुष्यबळ कमी पडत असून ते वाढविण्यासाठी मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर जयश्री सोनवणे यांनी सांगितले. तसेच त्यांनी ऑक्सिजन पुरवठाचा देखील आढावा घेतला.

साफसफाई, जेवणाचा दर्जा योग्य ठेवा

महापौर जयश्री महाजन यांनी कोविड रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली असता साफसफाई आणि जेवणाबाबत रुग्णांनी तक्रार केली. महापौरांनी याबाबत सूचना देत तात्काळ योग्य ती सुधारणा करण्याचे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now