जळगाव शहर

जळगावच्या डीएसपी चौकात कचरा अन् पाचोळ्याला आग ; परिसरात एकच खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील डीएसपी चौक परिसरात रात्रीच्या सुमारास वॉललगत साचलेल्या काड्या, कचरा आणि पाचोळ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

डीएसपी चौकातील वॉललगत मोठ्या प्रमाणात काड्या, कचरा आणि पाचोळा साचलेला होता. रात्री अचानक या कचऱ्याला आग लागली. काही वेळातच आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत काड्या, कचरा आणि पाचोळा जळून खाक झाला. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button