बातम्यासोने - चांदीचा भाव

लग्नसराईपूर्वी ग्राहकांसाठी खुशखबर! जळगावात सोनं 2500 तर चांदी 4 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ४ हजार रुपयांची घट झाली आहे. दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने या घसरणीमुळे दागिन्यांच्या खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काय आहेत सोन्याचा भाव?

जळगाव सराफ बाजारात गुरुवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २७ हजार ३२० रुपये होता. आज तो घसरून १ लाख २५ हजार ३५ रुपये झाला आहे. म्हणजेच २२ कॅरेट सोन्यात २ हजार २८५ रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर काल १ लाख ३९ हजार रुपये होता. आज त्यात २ हजार ५०० रुपयांची घसरण होऊन तो १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर आला आहे.

चांदीचा भाव

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. काल जळगाव सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८५ हजार रुपये होता. आज त्यात ४ हजार रुपयांची घट होऊन चांदीचा भाव १ लाख ८१ हजार रुपये प्रति किलोवर आला आहे.

एकंदरीत, सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे आगामी लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सराफ बाजारातील दरांमध्ये बदल होऊ शकत असल्याने प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफांकडून दरांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button