---Advertisement---
जळगाव शहर

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या विरोधात महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १ जुलै २०२४ | वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासह नादुरूस्त रोहित्र आणि जीर्ण वीजवाहक तार २४ तासाच्या आता बदलाव्या, यासह विविध मागण्यांचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांना देण्यात आले.

mahavitaran news jpg webp

गावठाण परिसरात २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, जुने धोकादायक तात्काळ बदलावे, नवीन वस्त्यांमध्ये वीजेचे खांब बसवून त्याठिकाणच्या वीजपुरवठा सुरळीत करावा,आदी मागण्यांचे निवेदन माजी पालकमंत्री राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता वेळेवर न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसोबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

---Advertisement---

याप्रसंगी शरदचंद्र पवार युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सहकारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा साधना पाटील, उपाध्यक्षा एश्वर्या पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, संचालक डा.अरूण पाटील, योगराज सपकाळे तसेच शिरसोलीचे अर्जून पवार, म्हसावदचे संजय पाटील, मजूर सहकारी फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम चौधरी,संचालक अनिल पा…
‎Read more

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---