जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहरातील इक़रा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच.जे. थींम महाविद्यालयाच्या वतीने मराठी संवर्धन पंधरवाडा निमित्त कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश कांबळे यांचे ‘मराठी भाषा -दशा व दिशा ‘ विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ राजेश भामरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. राजु गवरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, डॉ प्रकाश कांबळे म्हटले की, भाषेत शक्ति असते. प्रभावी भाषेव्दारे आपण उन्नती करू शकतो. कोणतीही भाषा बोली शुद्ध अशुद्ध नसते. आतापर्यंत प्रस्थापितां व्दारा बहुजनांची भाषेची उपेक्षा करण्यात आली. बहुजनांनी लिहिते व्हावे, भविष्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय प्रादेशिक भाषा माध्यम भाषा म्हणुन प्रचलित झाल्यास भारतीय भाषा व मराठीचे भविष्य उज्ज्वल आहे. विद्यार्थ्यानी लेखन, वाचन, श्रवण व भाषण कौशल्य विकसित करून व्यक्तिमत्त्व विकसित करावे.

कार्यक्रमात एस.एन.डी.टी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सतीश जाधव, डॉ सुंगधा पाटिल, प्रा.रेखा देवकर, डॉ.चांद खान, डॉ.अंजली कुलकर्णी, डॉ.इरफान शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रभारी प्राचार्य प्रा. आय.एम. पिंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.
हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?
- सोने-चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज! जळगावात आज दोन्ही धातूंचे दर घसरले
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी






