UPI ते पेन्शनच्या नियमांपर्यंत.. 1 ऑक्टोबरपासून पैशासंबंधित अनेक नियम बदलणार

सप्टेंबर 27, 2025 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । तीन दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. आणि १ ऑक्टोबरपासून, देशात अनेक महत्त्वाचे नियम लागू होतील, ज्यामुळे प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंग, डिजिटल पेमेंटसह एलपीजी गॅसपासून ते पेन्शनच्या नियमांचा समावेश आहे. चला तर, जाणून घेऊया १ ऑक्टोबर २०२५ पासून कोणते बदल होणार आहेत.

1st Octomber jpg webp

पेन्शनच्या नियमांत बदल

आता एनपीएस, यूपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाइटच्या नियमात बदल करण्यात आला आहे. पेन्शन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने सेंट्रल रेकॉर्डकिपिंग एजन्सीकडून मिळणाऱ्या फीमध्ये बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना PRAN उघडण्यासाठी E-PRAN किट १८ रुपये द्यावे लागणार आहे. तर फिजिकल PRAN कार्डसाठी ४० रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.

LPG गॅसच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत बदलतात. गेल्या अनेक महिन्यांपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाले आहेत. घरगुती गॅसच्या किंमती अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे आता या महिन्यात गॅसच्या किंमती बदलणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

बँकांना सुट्ट्या

ऑक्टोबर महिन्यात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. बँकांना २१ दिवस सुट्ट्या असणार आहे. यात दसरा, महात्मा गांधी जयंती आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

ऑनलाइन तिकीटचे नियम

ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता आरक्षण करण्यासाठी वेबसाइट सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त असे प्रवासी आरक्षण करु शकतात, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.

UPI च्या नियमांत बदल

आता ऑक्टोबर महिन्यात यूपीआयच्यादेखील नियमांत बदल केले जाणार आहेत. आता NPCI नवीन यूपीआय फीचर्समध्ये पीयर टू पीयर ट्रान्झॅक्शन बंद करण्याची शक्यता आहे. दरम्यान, फ्रॉड रोखण्यासाठी हा नवीन नियम लागू केला जाणार आहे.

पीएफ खातेधारकांसाठी दिलासा

ऑक्टोबर महिन्यात पीएफ (PF) खातेधारकांना सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. १०-११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत असा प्रस्ताव ठेवला जाईल की, सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून एटीएममधून थेट पैसे काढू शकतील. या बैठकीत किमान पेन्शन १,००० रुपयांवरून १,५००-२,५०० रुपयांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते. यासोबतच, ऑक्टोबरमध्ये ईपीएफओ (EPFO) आपली नवीन डिजिटल सेवा ‘EPFO 3.0’ सुरू करू शकते.

एकाच पॅन क्रमांकावर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक
पीएफआरडीएच्या नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) अंतर्गत एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. यापूर्वी फक्त एकाच योजनेत गुंतवणुकीची परवानगी होती, पण आता गुंतवणूकदार त्यांच्या सोयीनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडू शकतील. त्यामुळे, जर एखाद्याला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तो बॅलन्स्ड किंवा डेट स्कीम निवडू शकतो, तर जास्त परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार १००% इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now