---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

याला मंत्री कुणी केला? जरांगे पाटीलांचा भुजबळांवर तुफान हल्ला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२३ । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. जरांगे पाटील राज्यात विविध ठिकाणी सभा घेत असून त्यांची बीडमध्ये सभा आहे. या सभेला मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय. यावेळी मनोज जरांगे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर तुफान हल्ला केला.

jarange bhujbal jpg webp

मराठा समाज आतापर्यंत शांत आहे, पण सरकारने झोपू नये असंही ते म्हणाले. ते येवल्याचं येडपट माझी शाळा काढतंय, याला मंत्री कुणी केला? असा सवाल करत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.

---Advertisement---

मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाला डाग लावण्यात आला आहे, कुणी म्हणतंय आमची घरं जाळली, तर कुणी म्हटलं हॉटेल जाळली. आपल्यावर खोटे आरोप करण्य़ात आले. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, तो समाज कुणाची घरं कशाला पेटवेल? यांच्याच लोकांनी हॉटेलं जाळली आणि नाव मराठा समाजावर घातलं. सरकारही यांचंच ऐकतंय. पण आता मराठा समाज जागा झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कसं आणायचं ते बघाच.”

राज्य सरकारला इशारा देताना जरांगे म्हणाले की, “सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल. तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल. तुम्ही ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला 100 टक्के जड जाणार.”

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---