जळगाव जिल्ह्यातून महाजन आणि पाटील होणार शिंदेंचे शिलेदार

ऑगस्ट 9, 2022 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ ।  महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं. या सरकारला स्थापन होऊन ४० दिवस उलटले तरी अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र शिंदे-भाजप सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लागलाय. जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार गिरीश महाजन तर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

 या शपथविधी वेळी शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे. मंत्री पदाचा विस्तार न झाल्याने राज्यातील बरीच काम खोळंबली होती. मात्र आता ती मार्गी लागणार आहेत.

gulabrao patil girish mahajan jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now