एरंडोल तालुका आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य पदी माधुरी पाटील

जून 10, 2021 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील प्रगतिशील शेतकरी माधुरी जगदिश पाटील यांची एरंडोल तालुका आत्मा अंतर्गत स्तरीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

एरंडोल तालुका स्तरीय सल्लागार समिती ही नव्याने पूनर्गठीत करण्यात आली असून सदर शेतकरी सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.अशा आशयाचे पत्र जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले.

माधुरी पाटील यांची शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. माधुरी पाटील या शिवसेनेचे कट्टर समर्थक जगदिश रवींद्र पाटील यांच्या पत्नी तर खडके बु ग्राम पंचायत चे माजी उपसरपंच रवींद्र त्रंबक पाटील यांच्या सून आहेत. त्यांच्या निवडी बद्दल संपूर्ण गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now