जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि एन.सी.सी. युनिट’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाहतूक सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
जळगाव जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी ए.एस. आय. सैय्यद मुजफ्फर अली (राष्ट्रपती पदक सन्मानित) एन.सी.सी.च्या छात्रसैनिकांसाठी जुना कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
सैय्यद मुजफ्फर अली यांनी वाहतुक करतांना नागरिकांनी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत. भारतात दरवर्षी रस्ता अपघातात किती मृत्यु घडतात. नविन नियम कोणते लागू झाले आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना डॉ. एल.पी. वाघ, विभाग प्रमुख यांनी केली सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार तर आभार एन.सी.सी चे अधिकारी लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी मानलेत.
- HSC Result 2022 : 12वीचा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होईल, अशा प्रकारे पाहता येईल रिझल्ट
- जिल्ह्यातील १७ प्राथमिक शाळांची ‘आदर्श’ शाळांमध्ये समावेश
- Maharashtra Police Bharati 2022 : लवकरच राज्यात ७००० पद भरली जाणार
- टिक टॉक बनवायला शिकायच आहे ? या विद्यापीठात घ्या ऍडमिशन
- आरटीई प्रवेशाची मुदत आज संपणार; अजूनही ३० हजार जागा रिक्त; तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार का?
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज