सर्वसामान्यांना दिलासा ! सलग दुसऱ्या महिन्यात LPG गॅसच्या किंमती घसरण, आजपासून नवीन दर लागू

जुलै 1, 2025 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. त्यानुसार आज ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या नवीन किंमती अपडेट केल्या असून आज १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ५८.५ रुपयांची कपात करण्यात आलीय.

gas price 1 july

आजपासून (१ जुलै) नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी १ जून २०२५ रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली होती.

आज व्यावसायिक सिलिंडर ५८.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. यांनतर आता मुंबईत १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत १६१६ होणार आहे. दिल्लीत १९ किलो वजनाचे सिलिंडरची किंमक आजपासून १६६५ रुपये होणार आहे. ही किंमत याआधी १७२३.५० रुपये होती. कोलकत्तामध्ये सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. या किंमतीत ५७ रुपयांनी घट झाली आहे.

कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा अशा व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कमर्शियल गॅस वापरला जातो. दरम्यान, घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.या किंमती जशाच तशा आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now