जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । दर महिन्याप्रमाणे तेल विपणन कंपन्यांनी आज १ ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले. त्याप्रमाणे तेल कंपन्यांनी सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन दर आज १ ऑगस्पासून लागू झाले. ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना निश्चितच काहीसा दिलासा मिळेल. तथापि, यावेळीही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक सिलिंडरची किंमत

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार, १ ऑगस्टपासून १९ किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत ₹३३.५० ने कमी करण्यात आली आहे. या दुरुस्तीनंतर, दिल्लीत त्याची नवीन किंमत ₹१,६३१.५० झाली आहे, तर मुंबईत ती ₹१,५८३, कोलकातामध्ये ₹१,७३५.५० आणि चेन्नईमध्ये ₹१,७९० प्रति सिलिंडर झाली आहे.
मार्च महिन्यापासून आतापर्यंत व्यावसायिक सिलिंडर सलग पाच महिन्यात 170 रुपयांची घसरण आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे आहेत. एप्रिल महिन्यात यापूर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत बदल दिसून आला होता. एप्रिल महिन्यात मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ झाली होती. तेव्हापासून त्यात कपात झालेली नाही.












