---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, जळगावात कुणाला संधी?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. मात्र या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश नाहीय. महविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला सुटली आहे. मात्र येथून ठाकरे गटाकडून उमेदवाराचा शोध सुरु असून कोणाला संधी मिळेल याकडे लक्ष लागले आहे.

udhav thakre jpg webp

संजय राऊतांच ट्विट
संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांची पहिली यादी ट्विट केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य-श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे…, असं ट्विट करत संजय राऊतांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

---Advertisement---
image 6
शिवसेना ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर, जळगावात कुणाला संधी? 1

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर

  1. यवतमाळ- संजय देशमुख
  2. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
  3. सांगली -चंद्रहार पाटील
  4. हिंगोली- नागेश अष्टीकर
  5. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
  6. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
  7. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
  8. नाशिक- राजाभाऊ वाझे
  9. रायगड – अनंत गिते
  10. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  11. ठाणे- राजन विचारे
  12. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
  13. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
  14. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
  15. मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
  16. परभणी- संजय जाधव

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---