जून महिन्यात बँका ‘इतके’ दिवस बंद राहणार? RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर..

मे 30, 2025 11:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । मे महिना संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. यांनतर जून महिन्याला सुरुवात होतील. दरम्यान,जर तुम्हाला जून २०२५ मध्ये बँकेत जाऊन महत्वाची काम करायचे असेल, तर प्रथम जूनमध्ये बँका कधी बंद असतील हे आधी जाणून घ्या.

bank holidays

देशातील कोट्यवधी बँक ग्राहक शाखेत जातात आणि त्यांची अनेक कामे करतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, जूनमध्ये सर्व राज्यांमध्ये बँक शाखा कधी बंद असतील हे जाणून घेणे महत्वाचे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रसंगी जून महिन्यात बँका एकूण १२ दिवस बंद राहतील. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार वगळता, राज्यांनुसार सर्व सुट्ट्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जूनमधील सुट्ट्यांची यादी
१ जून (रविवार)- सर्व राज्यांमध्ये बँका बंद
६ जून (शुक्रवार)- ईद-उल-अजहा (केरळमध्ये बँका बंद)
७ जून- शनिवर- बकरी ईद (देशात सर्व बँका बंद)
८ जून- रविवार
११ जून (बुधवार)- संत कबीर जयंती (हिमाचल आणि सिक्किममध्ये बँका बंद)
१४ जून (शनिवार)- दुसरा शनिवार (देशातील सर्व बँका बंद)

१५ जून (रविवार)- देशातील सर्व बँका बंद
२२ जून (रविवार)- सर्व बँकांना सुट्टी
२७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद)
२८ जून (शनिवार)- चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)
२९ जून (रविवार)- बँका बंद
३० जून (सोमवार)- रेमना नी (मिझोराममध्ये बँकांना सुट्टी)

ऑनलाइन सर्व्हिस सुरु
जरी जून महिन्यात बँका १२ दिवस बंद असल्या तरी ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यव्हार करु शकतात. तुम्हाला सुट्ट्यांमध्ये चेक क्लिअरिंग किंवा बँखेतील कामे करता येणार नाहीत. परंतु डिजिटल कामे सुरु राहणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment