⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खडसेंच्या अडचणीत वाढ, महिला आयोगाचे पोलीस अधिक्षकांना पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर इथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून आता खडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. कारण खडसेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करा, असे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर इथे खडसे यांनी आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. याबाबत अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस या तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून, खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार
दरम्यान, अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती. त्यावेळी दमानिया यांनी खडसेंच्या विधानाचा व्हिडीओ ट्विट केला होता. तसंच सविस्तर पत्र लिहून फडणवीसांकडे तक्रार केली होती. खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती.