आदिवासी भागातील डोलारखेड्याला विधी सेवा शिबीर

ऑगस्ट 25, 2022 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । डोलारखेडा येथे जिल्हा विधी प्राधिकरण, जिल्हा आपत्ती विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गावकऱ्यांसाठी विधी सेवा शिबीर घेण्यात आले. यावेळी कायदेशीर जनजागृती व विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.

jalgoan 21

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अचानक आलेल्या आपत्ती प्रसंगी स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण तर्फे कायदे विषयक मार्गदर्शन, शेतकरी, शेतमजुर,आदिवासींसाठी असलेल्या विविध योजना अश्या विविध विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. म्हणजे, आरोग्य तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वन्यजीव मानव संघर्ष टाळण्या बाबद मार्गदर्शन व शून्य सर्पदंश अभियान अंतर्गत सर्पदंश उपचार, सापांची ओळख, प्रथमोपचार या विषयी जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली होती.

या प्रसंगी न्यायाधीश ए.ए. शेख, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिह रावळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वनपाल डी.जी. पाचपांडे, वंरक्षक दिपाली बेलदार, जी.बी.गोसावी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, नायब तहसीलदार झांबरे व तहसिल कार्यालय मुक्ताईनगर येथील कर्मचारी, जिल्हा उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ.शोएब खान, पंचायत समिती मुक्ताईनगर येथील साहाय्यक गट विकास अधिकारी युवराज अढागडे, ग्रामसेवक सुनिल नवले, कृषी विभागातर्फे अशोक पाटील, योगेश ठाकरे व जिल्हा रुग्णालय येथील अधिकारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा विधी प्राधिकरण, नगरसेवक नितिन बरडे, वन्यजीव संस्था, दैनिक दिव्य मराठी चे वार्ताहर गणेश सुरसे यांच्या प्रयत्नातुन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात मुक्ताई भवानी अभयारण्यात अरण्यवाचन करण्यात आले. यात न्यायाधीश शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला. वन्यजीव अभ्यासक रवींद्र फालक, राहुल सोनवणे, सतीश कांबळे, प्रसाद सोनवणे, राजेश सोनवणे यांनी सर्प, पक्षी, कीटक, वनस्पती , वन्यजीव आणि इतर जैवविविधते बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची आपल्या गावात उपस्थिती पाहुन नागरीकांमध्ये उत्साह होते. याप्रसंगी सरपंच मीनाताई पाटील, उपसरपंच अनिल कोळी, ग्रामसेवक सुनिल नवले, सदस्य नितीन पाटील, राजेंद्र भोई, ग्रा.पं.कर्मचारी रविंद्र कोळी, रवी कोळी, यशवंत घाटे, ग्रामस्थ पुंडलीक पाटील, महेंद्र गरुड, विनोद थाटे, पंढरी पाटील, पुरुषोत्तम सोनार, वासुदेव बावस्कर, विनोद पाटील, अमोल कोळी, हर्षल पाटील, पो.पाटील संदिप इंगळे, प्रमोद गायकवाड, सुरेश महाले, सचिन सोनार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories