⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

विद्यापीठात खासदार उन्मेष पाटील यांचे व्याख्यान‎

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चाैधरी‎ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या‎ रसायन तं‌त्रज्ञान संस्थेत‎ खासदार उन्मेष पाटील यांचे‎ गुरुवारी व्याख्यान झाले.‎ ‘यश हे बाजारात विकत‎ मिळत नाही ते अभ्यास करून‎ व अथक प्रयत्नांतून मिळवावे‎ लागते. असे खा. उन्मेष पाटील मानले.

विद्यार्थ्यांनी सर्व‎ विषयांचे ज्ञान प्राप्त करणे‎ आवश्यक आहे. असा सल्ला‎ त्यांनी दिला. संचालक प्रा. जे.‎ बी. नाईक हे अध्यक्षस्थानी‎ होते. अभियांत्रिकी शिक्षणाची‎ चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी‎ सुवर्णकाळ असतो. त्याचा‎ क्षण-क्षण उपयोगात आणून‎ ज्ञान संपादन केले पाहिजे.‎ इतरांशी वाद करण्यापेक्षा संवाद‎ साधावा. इतरांना दोष देण्यापेक्षा‎ आपल्यातील उणिवा दूर‎ कराव्यात असा सल्ला पाटील‎ यांनी विद्यार्थ्यांना दिला.‎