स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नोव्हेंबर 18, 2021 5:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नशिराबाद येथील शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

Nashirabad jpg webp

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नशिराबाद बस स्थानकावरील शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच बस स्थानकावर लावण्यात आलेल्या फलकाजवळ मेणबत्ती पेटवून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना शहर प्रमुख चेतन बऱ्हाटे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगून शिवसेना पक्षाला बळकटी आणण्यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चंदु भोळे, माजी सरपंच विकास पाटील, विनायक धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर, बंडु रत्नपारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी, मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळी, सोहन पाटील, सतिश रोटे, भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now