लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात.. ३००० की ४५०० रूपये? चेक करा खातं..

मे 15, 2026 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याबाबत अखेर मोठी अपडेट समोर आली आहे. ईकेवायसी (e-KYC) पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल गुरुवार संध्याकाळपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांचा निधी रखडल्याने यंदा एकत्रित ३००0 ते ४५०० रुपये मिळतील, अशी आशा लावून बसलेल्या महिलांच्या खात्यात केवळ एकाच महिन्याचा (१५०० रुपये) हप्ता जमा झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

ladki bahin

फेब्रुवारी २०२६ मध्ये महिलांच्या खात्यात शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर तब्बल तीन महिने कोणताही निधी जमा झाला नव्हता. ई-केवायसी पडताळणी आणि नवीन आर्थिक वर्षामुळे हप्ते रखडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे महिलांना एकाचवेळी दोन किंवा तीन महिन्यांचे पैसे मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात सरकारकडून केवळ एका महिन्याचा म्हणजेच १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून पहावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांचे पैसे कधी?

अर्धा मे महिना संपत आला तरी केवळ मार्चचेच पैसे मिळाल्यामुळे, आता एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार? असा सवाल पात्र महिला विचारत आहेत. एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार की मे महिन्याच्या अखेरीस एप्रिलचा हप्ता वेगळा दिला जाईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

७० लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची ई-केवायसीद्वारे पडताळणी प्रक्रियेनंतर राज्यातील तब्बल ७० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याने, तर काही महिला निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख महिला पात्र असून त्यांनाच पुढे दरमहा १५०० रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. अपात्र लाभार्थी कमी झाल्यामुळे सरकारचे सुमारे १० हजार कोटी रुपये वाचणार असल्याचेही सांगितले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now