लाडक्या बहिणींचे टेंशन वाढलं ; तब्बल १ कोटीहून अधिक महिला अपात्र? वाचा सरकारची नवी अपडेट

मार्च 9, 2026 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत आता मोठी गाळणी लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला सुमारे २ कोटी ५३ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, सरकारकडून सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेनंतर सुमारे १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

ladki bahin yojan

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले होते. या योजनेत सुरुवातीला २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळत होता. आता मात्र ही संख्या फार कमी झाली आहे. निकषांनुसार तपासणी सुरू झाल्यानंतर अनेक महिलांचे लाभ थांबवण्यात आले. काही महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर काही महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

जवळपास एकूण १ कोटी महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने निधी मंजुर केला आहे. २६,५०० कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे वय २१ ते ६५ यामध्येच असावे. महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन नसावे. एका कुटुंबातील दोन महिलाच योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच कुटुंबातील कोणीही कर भरत नसावा

सुरुवातीला फक्त काही कागदपत्रांद्वारे अर्ज दाखल केले जात होते. त्यानंतर महिलांचे अडीच लाख उत्पन्न असेल तर त्यांना बाद केले. २०२४ पासून होत असलेल्या पडताळणी १ कोटी ५ लाख महिला अपात्र ठरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now