कुर्‍हा ग्रामपंचायतीचे सौर उर्जेवरील पथदिवे लांबवले!

सप्टेंबर 8, 2022 11:29 AM

Bhusawal News -जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा ग्रामपंचायतीचे 30 हजार रुपये किंमतीचे सौर उर्जेवरील पथदिवे व तीन बॅटर्‍या चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवार, 6 रोजी सायंकाळी सात वाजता ही चोरी झाली. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल होऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

crime 2022 09 03T132219.635 1 jpg webp

कुर्‍हा ग्रामपंचायतीचे शिपाई संदीप रघुनाथ बारी (43) यांच्या फिर्यादीनुसार, कुर्‍हे गावातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ सौर उर्जेवरील पथदिवे लावण्यात आले होते व त्यासाठी तीन बॅटर्‍याही होत्या. मंगळवारी सायंकाळी सात वाजता संशयीत आरोपी सागर रामदास सोनवणे (26), दयानंद निवृत्ती कोळी (22) व चेतन गोकुळ सोनवणे (18, रा.कानसवाडी, जि.जळगाव) यांनी संधी साधून बॅटरी व लाईट लांबवले.

चोरी होत असताना तरुणाने हटकल्यानंतर आरोपींनी आम्ही ठेकेदाराची माणसे असून पथदिवे बंद असल्याने दुरुस्तीसाठी नेत असल्याची थाप मारली मात्र तरुणाने चोरी होत असताना व्हिडिओ बनवला होता व त्यातील फुटेजच्या आधारे आरोपींना तालुका पोलिसांनी पकडले. 1तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now