KTM 200 ड्यूक आणि 250 ड्यूक नवीन रंगांसह भारतात लाँच; किती आहेत किंमत?

फेब्रुवारी 25, 2026 1:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । KTM इंडियाने ड्यूक मालिकेतील त्यांच्या दोन बाइक्स, KTM 200 ड्यूक आणि KTM 250 ड्यूक, नवीन रंग पर्यायासह लॉंच केल्या आहेत. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात दाखवल्या गेलेल्या नवीन रंग पर्यायांसह या बाइक्स सादर केल्या आहेत. केटीएम २५० ड्यूक आता स्लेट ग्रे आणि सिल्व्हर मेटॅलिकमध्ये उपलब्ध असेल, तर केटीएम २०० ड्यूकला नवीन अटलांटिक ब्लू रंग देण्यात आला आहे. यामुळे या बाइक्स पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसतात.

KTM

KTM 250 ड्यूकची वैशिष्ट्ये
KTM 250 ड्यूक आता स्लेट ग्रे आणि सिल्व्हर मेटॅलिक सारख्या नवीन, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळं त्यांचा स्ट्रीटफायटर लूक आणखी आकर्षक झाला आहे. यात 248.8 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 30.75 बीएचपी आणि 25 एनएम टॉर्क जनरेट करतं. या बाईक स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेल्या आहे. त्यामुळं स्मूथ आणि कंट्रोल्ड रायडिंग अनुभव मिळतो. यात डब्ल्यूपी एपेक्स सस्पेंशन, 320 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रियर डिस्क ब्रेक्स, ड्युअल-चॅनेल एबीएससह आहेत. 17-इंच चाके, 800 मिमी सीट उंची आणि अंदाजे 163 किलो वजन यामुळं ती संतुलित राहते.

केटीएम 200 ड्यूकची वैशिष्ट्ये
केटीएम 200 ड्यूक आता नवीन अटलांटिक ब्लू रंगात उपलब्ध आहे, ज्यामुळं ती पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसते. यात 199.5 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 24.68 बीएचपी आणि 19.3 एनएम टॉर्क जनरेट करतं. ही बाईक स्लिपर क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे, ज्यामुळं गियर शिफ्टिंग सोपं होतं. यात WP सस्पेंशन सेटअप, 300 मिमी फ्रंट आणि 230 मिमी रिअर डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनेल ABS आहेत. 17-इंच चाकं चांगली रोड ग्रिप देतात.

किती आहेत किंमत ?
रंग बदलले असले तरी, दोन्ही बाईकच्या किमती बदलल्या नाहीत. केटीएम २५० ड्यूकची किंमत ₹२.१३ लाख (एक्स-शोरूम) कायम आहे. केटीएम २०० ड्यूकची किंमत ₹१.९३ लाख (एक्स-शोरूम) कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now