⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

कृष्ण जन्माष्टमी : भुसावळ कोटेचा महिला महाविद्यालयात विविध कार्यक्रम!

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । विद्यार्थिनींनी समाजात सामाजिक सलोखा जपून त्याद्वारे बंधुता व एकता जोपासणे खूप गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी केले. कृष्ण जन्माष्टमीनिमीत्त भुसावळ येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

तसेच तुम्ही सावित्रीच्या लेकी समाजात बंधुभाव नक्की निर्माण कराल अशी मला खात्री आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संगीत खुर्ची, दहीहंडी फोडणे असे कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या वेशभूषेत कल्याणी पाटील आणि राधेच्या वेशभूषेत मेघना भारद्वाज व गोपिकेच्या भूमिकेमध्ये नयना सपकाळे, पूजा हडपे, हर्षा तायडे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. निलेश गुरचल, प्रा. सचिन पंडित प्रा.सुरज हेडा डॉ. गिरीश कोळी प्रा.विनोद भालेराव प्रा. गिरीश सरोदे मनिषा इंगळे केले. आभार कल्याणी पाटील या विद्यार्थिनीने मानले.