---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

खडसे आणि पाटील आमने सामने; राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन्ही गटांतील जिल्हा प्रभारींची नावे जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २३ ऑगस्ट २०२३। खान्देशच्या जबाबदारी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन्ही गटांतील जिल्हा प्रभारींची नावे जाहीर करण्यात आली आहे. खान्देशची जबाबदारी अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील यांना, तर शरद पवार गटाकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देण्यात आली आहे.

image 70 jpg webp webp

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे एकमेव आमदार अनिल पाटील अजित पवार गटात गेले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेते मात्र शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे साथ देत आहेत. जळगांव, धुळे, नंदुरबार हा खानदेश भाग राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे तर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जळगांव, धुळे, नंदुरबार व बुलढाणा हा भाग देण्यात आला आहे.

---Advertisement---

या दोन्ही नेत्यांना आता जिल्ह्यात आपला पक्ष बळकट करावयाचा आहे. त्यांचा आता खऱ्या अर्थाने कसं लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते एकेकाळी भाजपमध्ये असताना ते एकमेकांचे अत्यंत निकटचे मानले जात होते. त्यामुळे दोघांचा खरा आमना- सामना होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---