---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

…म्हणून शरद पवार आमच्या घरी आले : जयश्री महाजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | महायुतीचे नेते खा.शरद पवार आमचे नेते आहेत. जळगाव दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी आमच्या घरी येऊन आशीर्वाद द्यावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली होती म्हणून ते आमच्या घरी आले, असे माजी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

sharad pawar jayashree mahajan jpg webp

जळगाव मनपातील आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, रियाज बागवान, किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते.

---Advertisement---

माजी महापौर पुढे म्हणाल्या की, आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पद्धत वेगळी आहे. आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पक्ष जो आदेश देईल ते आम्ही करतो. पक्षश्रेष्ठी ज्या कुणाला उमेदवारी देणार त्याच्यासाठी आम्ही ताकदीने काम करणार असल्याचे माजी महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

मी मनपात कधीही स्वार्थीपणा केला नाही. शहराच्या विकासासाठी नेहमी बेरीज करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. जळगाव मनपा प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अनावरण सोहळ्याचे आमंत्रण सर्व पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना आणि नगरसेवकांना दिले होते. आम्ही कुठेही दूजाभाव केला नाही. काहींनी यामध्ये राजकीय नाट्य खेळण्याचा प्रयत्न केला. मनपा एक स्वायत्त संस्था असून त्याठिकाणी आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केव्हा करावे हा त्या संस्थेचा विषय असल्याने पुतळा अनावरण नियोजित तारखेलाच झाले, अशी माहिती माजी महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---