जळगावात पावसाची प्रतीक्षा संपणार ! वाचा हवामान खात्याचा महत्त्वपूर्ण अंदाज..

जुलै 24, 2025 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । मागच्या काही दिवसापासून सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा परतला असून राज्यात सध्या काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.

RN24

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. आगामी दोन दिवस ठराविक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर २६ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासाठी जिल्ह्यात यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. वेगवान वाऱ्यांमुळे उकाडा कमी होणार आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून महिन्यात १०० टक्के सरासरी गाठलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत तब्बल २५ टक्क्यांची तूट निर्माण केली आहे. केवळ जुलै महिन्याचा विचार केल्यास ही तूट ४६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पाऊस नसल्याने खरेदी हंगाम धोक्यात आला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र आता राज्यात पाऊस परतला असून जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
ऑरेंज अलर्ट (जोरदार पाऊस) : मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा.
-यलो अलर्ट (मध्यम ते जोरदार पाऊस) : कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
-विजांसह पाऊस (यलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now