जळगाव शहर

जळगाव पोलीस व्यायामशाळा सर्वांसाठी खुली; बाहेरील नागरिकांसाठी मासिक फी किती?

जळगाव लाईव्ह न्यूज । नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जळगाव पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जळगाव येथील पोलीस व्यायामशाळेत आता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह बाहेरील महिला व पुरुषांनाही सभासदत्व घेता येणार आहे.

या व्यायामशाळेत आधुनिक व्यायाम साहित्य आणि विविध प्रकारची उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्रपणे व्यायामाची सुविधा असल्याने नागरिकांना नियमित व्यायाम करून फिटनेस राखण्याची संधी मिळणार आहे.

सभासदत्वासाठी किती शुल्क?

पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पात्र सभासदांसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये असून, मासिक शुल्क ४०० रुपये आणि वार्षिक शुल्क ४ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे.

तर बाहेरील नागरिकांसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये, मासिक शुल्क ८०० रुपये आणि वार्षिक शुल्क ८ हजार रुपये असेल.

व्यायामाची आवड असलेल्या नागरिकांनी पोलीस व्यायामशाळेतील या सुविधेचा लाभ घ्यावा आणि नियमित व्यायामाला आपल्या दिनचर्येत स्थान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button